कोल्हापूर :कोल्हापूरच्या रुईकर कॉलनीमध्ये बिबट्या शिरला होता. त्यामुळे पहाटे बराच गोंधळ उडाला. अखेर वन अधिकारी, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शिताफीनं बिबट्याला जेरबंद केले.
रुईकर कॉलनीत बिबट्या शिरल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. खासदार धनंजय महाडिक यांच्या बंगल्यासमोरच्या रिकाम्या जागेत हा बिबट्या अचानक आल्याने नागरिकांत भितीचे वातावरण होते. या बिबट्याला पकडण्यात वनाधिकाऱ्यांना यश आले तरी योग्य नियोजन नसल्यामुळे नागरिकांनाच बाहेर पडावे लागले होते. त्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती.
या बिबट्याने एका व्यक्तीवर हल्लादेखील केला आहे. या हल्ल्यात प्रमोद देसाई हे जखमी झालेत. बिबट्या मानवी वस्तीत शिरल्यानं त्याला बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दीही याठिकाणी जमली आहे. हा बिबट्या एका घरात शिरून बसल्याने वातावरण तणावाचे बनले होते. सोप्याखाली बसलेल्या बिबट्याला पकडण्यात पोलीस आणि वनाधिकाऱ्यांना यश आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.