विधान परिषदेत निवडणूक : काँग्रेसची बाजी तर राष्ट्रवादीची पिछेहाट, शिवसेना-भाजपची मुसंडी

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. गेल्यावेळी चार जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादीनं 3जागा गमावल्या. मात्र, काँग्रेसने मुसंडी मारत दोन जागा आघाडी न करता पदरात पाडून घेतल्या आणि राष्ट्रवादीला दे धक्का दिला.

Updated: Nov 22, 2016, 12:44 PM IST
विधान परिषदेत निवडणूक : काँग्रेसची बाजी तर राष्ट्रवादीची पिछेहाट, शिवसेना-भाजपची मुसंडी title=

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. गेल्यावेळी चार जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादीनं 3जागा गमावल्या. मात्र, काँग्रेसने मुसंडी मारत दोन जागा आघाडी न करता पदरात पाडून घेतल्या आणि राष्ट्रवादीला दे धक्का दिला.

या निवडणुकीत स्वतंत्रणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी लढले होते. याचा फायदा काँग्रेसला झाला. राष्ट्रवादीची मस्ती चांगलीच उतल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले. भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेनं प्रत्येक एक जागा पटकावली. सातारा-सांगली, यवतमाळ आणि भंडारा गोंदिया या तीन जागांवर राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. गेल्यावेळी शिवसेनेला एकही जागा मिळाली नव्हती. यावेळी मात्र यवतमाळची जागा राष्ट्रवादीकडून हिरावून घेण्यात शिवसेनेला यश आले आहे.

सांगली सातारा विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसचे मोहनराव कदम यांना 63 मतांनी विजय मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. सांगलीत राष्ट्रवादीची 127 मतं असूनही राष्ट्रवादीचे उमेदवार  शेखर गोरे पराभूत झाले.  राष्ट्रावादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पण काँग्रसेचे पतंगराव कदम यांनी बाजी मारललीय. मोहनराव कदम यांना 309 मतं पडली. तर शेखर गोरे यांना 246 मतं मिळाली. विशेष म्हणजे शेखर गोरे आणि मोहनराव कदम यांच्या नावाशी साधर्म्य असणारे दोन उमेदवारही रिंगणात होते त्यांना प्रत्येकी दोन मतं मिळाली. तर 10 मतं बाद झाली आहेत.  

भाजपने भंडारा गोंदियाची जागा राष्ट्रवादीच्या पारड्यातून हिसकावून घेतलीय. तर सातारा सांगलीत सर्वपक्षीय 'सांगली पॅटर्न'मुळे काँगेसचे मोहनराव कदम विजयी झालेत. या ठिकाणी राष्ट्रवादीचे बडे नेते जयंत पाटील आणि अजित पवार याची प्रतिष्ठा पणाला लागली होती. येथे काँग्रेसचे पतंगराव कदम यांनी बाजी मारत ही जागा काँग्रेसकडे खेचून आणली. या ठिकाणी सर्वाधिक मतदार राष्ट्रवादीचे होते, तरीही राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या नांदेडचा गड राखण्यात काँग्रेसला यश आलंय. काँग्रेसचे उमेदवार अमर राजूरकर यांना एकूण 471 मतांपैकी 251 मतं मिळाली आहेत.  तर अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांना 208 मतं मिळाली तर 12 मतं बाद ठरली.  त्यामुळे राजूरकरांचा 43 मतांनी विजय झालाय. इकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनंही आपलं वर्चस्व कायम राखलंय. राष्ट्रवादीचे अनिल भोसलेंनी भाजपच्या अशोक येनपुरे यांचा पराभव केला. भोसलेंना 330 तर येनपुरेंना 133 मतं पडली.  जळगावातही भाजपच्या उमेदवाराला यश आलंय. गिरीश महाजन गटाचे चंदूलाल पटेल यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी विजय पाटील यांच्यावर दणदणीत विजय मिळवलाय.