फाशी देण्यापूर्वी याकूब शेवटचे शब्द

 १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोट हल्ल्यातील दोषी आणि फाशी देण्यात आलेला याकूब मेमन याने गुन्हा कबूल केला होता आणि त्याला मृत्यू समोर दिसत होता. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तो म्हणाला, तुम्ही तुमची ड्युटी करत आहे... त्यामुळे मी तुम्हांला माफ करतो आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या सूत्रांनी दिलेल्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. 

Updated: Aug 3, 2015, 06:22 PM IST
 फाशी देण्यापूर्वी याकूब शेवटचे शब्द  title=

नागपूर :  १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्फोट हल्ल्यातील दोषी आणि फाशी देण्यात आलेला याकूब मेमन याने गुन्हा कबूल केला होता आणि त्याला मृत्यू समोर दिसत होता. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तो म्हणाला, तुम्ही तुमची ड्युटी करत आहे... त्यामुळे मी तुम्हांला माफ करतो आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राच्या सूत्रांनी दिलेल्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, फाशीच्या फंद्याकडे जाणाऱ्या याकूबने म्हटले की, मी आणि माझ्या खुदाला माहीत आहे, की खरं काय आहे. तुम्ही ड्युटी करत आहेत. मी तुम्हांला माफ करतो. 

फाशीवेळी त्याचा थरकाप झाला नाही. त्याने मृत्यूला मान्य केले होते. त्याला सकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी बाहेर काढण्यात आले. त्याच्या चेहऱ्याला काळ्या कपड्याने झाकण्यात आले. त्याचे हात मागे बांधण्यात आले. त्याला घेऊन तीन कॉन्स्टेबल फाशीच्या फंद्याकडे घेऊन गेले. 

फाशीच्या फंद्याकडे जाताना कॉन्स्टेबलने म्हटले चप्पल... याकूब कॉन्स्टेबलचं म्हणणं समजला. त्याने चप्पल काढली. त्याने त्यानंतर तसाच फंद्याकडे गेला. 

याकूबच्या आयुष्याच्या १० मिनिटांबद्दल सूत्रांनी सांगितले की, 'जेल अधीक्षक योगेश देसाई यांनी सात वाजता फाशीचा लिव्हर दाबायला सांगितले. सकाळी साडे सात वाजता त्याचा मृतदेह फाशीच्या फंद्यावरून काढण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.