नागपूर : अगोदर तो तडीपार होता. त्यानंतर तो नागपूरमध्ये परत आला. मग त्यानं एक रिक्षा घेतली. आणि पुन्हा त्याच्यातल्या गुन्हेगार जागा झाला. ही कहाणी आहे लादेनची.
याचं मूळ नाव सिद्धार्थ गजभिये. दिवसा ऑटोरिक्षा चालवत चालवत प्रवाशांच्या घरांची रेकी करायची आणि रात्री त्या घरात शिरून दागिन्यांची चोरी करावी, असा त्याचा शिरस्ता. गंमत म्हणजे चोरलेले दागिने तो सराफा व्यापा-यांकडं गहाण ठेवायचा. मात्र पकडले जाण्याच्या भीतीनं ते दागिने परत घ्यायला कधीच जायचा नाही.
आजवर या लादेननं ३१ घरफोड्या केल्या आहेत. हा प्रकार उघड झाल्यानंतर शहरातले रिक्षाचालकदेखील संतप्त झालेत. लादेनने आमच्या रिक्षा व्यवसायाला बटा लावला आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी येथील रिक्षा व्यवसायिकांनी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.