घरबसल्या 'फेसबुक दिंडी' अनुभवा मोबाईलवर!

यंदाच्या आषाढ़ी वारीत देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यातील पालखीचा प्रवास तुम्हाला घरबसल्या अनुभवता येणार आहे. देहूतल्या चार तरुणांनी यासाठी तयार केलंय एक मोबाईल अॅप... 

Updated: Jul 8, 2015, 12:58 PM IST
घरबसल्या 'फेसबुक दिंडी' अनुभवा मोबाईलवर! title=

देहू : यंदाच्या आषाढ़ी वारीत देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यातील पालखीचा प्रवास तुम्हाला घरबसल्या अनुभवता येणार आहे. देहूतल्या चार तरुणांनी यासाठी तयार केलंय एक मोबाईल अॅप... 

पालखीच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यातील चित्रीकरण जीपीएस सिस्टमच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर घरबसल्या पालखीचा सोहळा अनुभवण्याची संधी मिळणार आहे.. यासाठी तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या चार तरुणांनी 'फेसबुक दिंडी' नावाचं अॅप तयार केलंय, अशी माहिती स्वप्नील मोरे या तरुणानं दिलीय. 

या अॅपच्या माध्यमातून पालखी सोहळ्यासोबतच दिंडीचा इतिहास, पालखी मुक्कामाचे प्रत्येक  ठिकाणी असलेले महत्त्व, रिंगण आणि नीरा स्नानाचे महत्त्व याचीही माहिती असणार आहे. यामुळे तरुणाईला पालखीचे महत्त्व समजण्यास मदत होणार आहे, असं अमित कुलकर्णी या तरुणानं म्हटलंय.

वारीला जाण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र नोकरी आणि इतर गोष्टीमुळं प्रत्येकाला ते शक्य होत नाही. त्यामुळं या देहूच्या तरुणांनी विकसित केलेल्या अॅपमुळं तुम्ही जिथं असाल तिथून पालखीचा अनुपम्य सोहळा अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.   

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.