नगर : कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणी तिसरा आरोपी नितीन भैलुमे याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे. तसंच त्याचा दोषमुक्तीचा अर्जही कोर्टानं फेटाळून लावला आहे. दरम्यान जामीनअर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी भैलुमेच्या वकिलांनी मागितली.
न्यायालयाने २७ ऑक्टोबर पर्यंत उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी सात नोव्हेंबरला होणार आहे. भैलुमे हा कोपर्डी प्रकरणातला तिसरा आरोपी आहे. कोपर्डीच्या गुन्ह्याशी काहीही संबंध नसून त्याच्यावर कुठलाही आरोप ठेवू नये असा अर्ज भैलुमेच्या वकिलांनी केला होता. मात्र कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावलाय.
पाहा व्हिडिओ
या प्रकरणाची सुनावणी आता ७ नोव्हेंबरला होणार आहे.