KDMC निवडणूक: भाजप-शिवसेना स्वबळावर लढणार?

कडोंमपाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलीय. पण युतीची निर्णय अजून काही झाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडी केलीय. पण शिवसेना-भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळतायेत. 

Updated: Oct 17, 2015, 10:32 AM IST
KDMC निवडणूक: भाजप-शिवसेना स्वबळावर लढणार? title=

कल्याण: कडोंमपाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलीय. पण युतीची निर्णय अजून काही झाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडी केलीय. पण शिवसेना-भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळतायेत. 

घटस्थापनेच्या दिवशीच म्हणजे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही पक्षांचे स्वतंत्र घट बसणार असं दिसतंय. तशी तयारीच भाजप-शिवसेनेनं केल्याचं दिसतंय. युती तुटल्याचं खापर आपल्यावर फुटू नये, यासाठी युती तुटल्याची अधिकृत घोषणा न करता थेट अर्ज भरले जातील आणि त्यातूनच युती तुटल्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला जाईल, असं सांगण्यात येतंय.

भाजपचा अंतर्गत सर्व्हे, ४८-५० जागा जिंकण्याचा अंदाज  

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपनं स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली अशून पक्षानं एक अंतर्गत सर्व्हे केलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपनं केलेल्या सर्वेनुसार एकट्याच्या बळावर भाजपला ४८-५० जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

कदाचित याच सर्वेच्या आधारे विधानसभा निवडणुकी सारखंच शिवसेनेशिवाय मैदानात उतरण्याची तयारी भाजपनं केलीय. याशिवाय मागील महापालिका निवडणुकीत मनसेची असलेली हवा आता नाहीय. त्याचाही फायदा मिळेल, अशी आशा भाजपला आहे. 

आणखी वाचा - कल्याण-डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले, भाजपला घेरले

अद्याप भाजप किंवा शिवसेनेकडून युतीबाबत कुणीही जाहीर केलेलं नाही. तेव्हा आता पुढे काय? हा आगामी काळच सांगेल. 

पाहा कसा आहे निवडणूक कार्यक्रम: 

एकूण जागा : १२२

मतदान : १ नोव्हेंबर २०१५

मतमोजणी : २ नोव्हेंबर २०१५

अर्ज देणं आणि स्वीकारणं : ६ ते १३ ऑक्टोबर २०१५

अर्जांची छाननी: १४ ऑक्टोबर २०१५

अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: १६ ऑक्टोबर २०१५

निवडणूक चिन्हांचे वाटप: १७ ऑक्टोबर २०१५

 

आणखी वाचा - कल्याण-डोंबिवलीची परिस्थिती बदलण्यासाठी स्मार्ट सिटीची निवड : मुख्यमंत्री

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.