माफी मागायला लावल्याच्या रागानं नराधमांचा मुकबधीर मुलीवर बलात्कार

मुलीची माफी मागायला लावल्याचा सूड घेण्याकरता त्या मुलीवरच नांदेडमधल्या दोघा नराधमांनी बलात्कार केला. नांदेड जिल्यातील खडकी गावात हा प्रकार घडलाय. तुकाराम गव्हाने आणि मारोती कदम अशी त्यांची नावं आहेत. 

Updated: Oct 11, 2015, 09:49 PM IST
माफी मागायला लावल्याच्या रागानं नराधमांचा मुकबधीर मुलीवर बलात्कार title=

नांदेड: मुलीची माफी मागायला लावल्याचा सूड घेण्याकरता त्या मुलीवरच नांदेडमधल्या दोघा नराधमांनी बलात्कार केला. नांदेड जिल्यातील खडकी गावात हा प्रकार घडलाय. तुकाराम गव्हाने आणि मारोती कदम अशी त्यांची नावं आहेत. 

आणखी वाचा - मुंबईत चेंबुर भागात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघड

मुकबधीर आणि गतिमंद असलेल्या मुलीची या गावगुंडांनी वीस दिवसांपूर्वी छेड काढली होती. त्यावर या दोघांना त्या मुलीची माफी मागायला लावण्यात आली होती. त्या रागापोटी सूड घेण्याकरता तुकाराम गव्हाने आणि मारोती कदम यांनी तिच्यावर बलात्कार केला.

आणखी वाचा - IPS अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, भाऊ आणि वडिलांनीही केला अत्याचार

याप्रकरणी लिबंगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन्ही आरोपींना अटक केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.