जुन्नर: जुन्नरमध्ये बिबट्यानं वनखात्याची लक्तरं वेशीला टांगली आहेत. रात्री पकडलेला बिबट्या काही तासांतच चक्क पिंजरा तोडून पळालाय. तब्बल पंधरा फूटांपर्यंत बिबट्यानं हा पिंजरा फरफटत नेलाय.
ज्या पिंजऱ्यात बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं, तो पिंजरा कमकुवत आणि नादुरूस्त असल्याचं समोर आलंय. जुन्नर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यामुळं तीन जणांचा बळी गेलाय. त्यामुळं वनविभागानं बिबट्याला पकडण्यासाठी डिंगोरे गावाजवळ 11 पिंजरे लावले होते.
त्यातल्या एका पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला होता. मात्र पिंजरा नादुरूस्त असल्यामुळं वनखात्याच्या हातावर तुरी देऊन हा बिबट्या पसार झाला. यामुळं परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या घटनेमुळं वनविभागाचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.