34 कुटुंब अचानक रस्त्यावर, पुणे महापालिकेची बेकायदेशीर कारवाई

कोणतीही पूर्वसूचना नाही… कोणतीही नोटीस नाही… महापालिकेची यंत्रणा अचानक येते आणि घरं पाडते. घरं पडल्यानंतर देखील त्याचं कोणतंही स्पष्टीकरण दिलं जात नाही. 

Updated: May 21, 2015, 11:47 AM IST
34 कुटुंब अचानक रस्त्यावर, पुणे महापालिकेची बेकायदेशीर कारवाई title=

पुणे: कोणतीही पूर्वसूचना नाही… कोणतीही नोटीस नाही… महापालिकेची यंत्रणा अचानक येते आणि घरं पाडते. घरं पडल्यानंतर देखील त्याचं कोणतंही स्पष्टीकरण दिलं जात नाही. 

महापालिकेनंच नियम पायदळी तुडवण्याचा प्रकार पुण्यातील स्वारगेट इथल्या सोनिया गांधी वसाहतीमध्ये घडला आहे. या ठिकाणच्या ९४ कुटुंबापैकी ६२ कुटुंबांना केंद्र सरकाच्या योजनेअंतर्गत नवीन घरं मिळाली आहेत. उर्वरित ३४ कुटुंब घरांच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, काल अचानक महापालिकेनं कारवाई करत ही ३४ घरं पाडून टाकली. 

महापालिकेची ही कारवाई नियमबाह्य असल्याचा आरोप रहिवाशांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. महापालिकेच्या बेकायदेशीर कारवाईमुळं ३४ कुटुंब अचानक उघड्यावर आली आहेत. महापालिकेच्या या अन्यायकारक कारवाई विरोधात आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.