‘नेहरू की मोदी’ आव्हाडांची जॅकेटवरून ‘आयडियाची कल्पना’!

विधीमंडळ अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडायचे असतात, याचाच विसर आमच्या लोकप्रतिनिधींना पडलाय की काय...? आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचंच उदाहरण घ्या... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काहीही कारण नसताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवरून नसता वाद ओढवून घेतला.

Updated: Dec 9, 2014, 03:52 PM IST
‘नेहरू की मोदी’ आव्हाडांची जॅकेटवरून ‘आयडियाची कल्पना’! title=

नागपूर: विधीमंडळ अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडायचे असतात, याचाच विसर आमच्या लोकप्रतिनिधींना पडलाय की काय...? आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचंच उदाहरण घ्या... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काहीही कारण नसताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवरून नसता वाद ओढवून घेतला.

विधिमंडळ परिसरात ‘तुम्ही कोणते जॅकेट घातले?’ अशी आमदारांना अनेकांकडून विचारणा करण्यात येत होती.  ‘जॅकेट’च्या या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘आयडियाची कल्पना’ लढवली. आकाशी रंगाच्या ‘जॅकेट’वर त्यांनी चक्क ‘धिस इज नेहरू जॅकेट’ असं लिहून आणलं अन् कोणाला प्रश्न विचारण्याची संधीच दिली नाही.

ऐन गुलाबी थंडीत होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनाची राज्यभरातील आमदारांना ओढ असतेच. थंडीमुळं अनेक आमदार निरनिराळ्या प्रकारचे ‘जॅकेट’ किंवा हाफ बाह्यांचं स्वेटरमध्ये दिसून येतात. परंतु यंदाच्या अधिवेशनात मात्र ‘जॅकेट’ घालणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. राज्यातील नवनियुक्त सरकारच्या स्थापनेनंतर उपराजधानीत पहिल्यांदाच होत असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक नवीन चेहरे दिसत आहेत. 

काळ्या किंवा राखडी रंगासोबतच निळे, जांभळे, गुलाबी, लाल तसंच हिरव्या रंगाचे ‘जॅकेट्स’ घातलेले आमदार एकामागोमाग एक विधिमंडळात प्रवेश करीत होते. केवळ सत्तापक्षच नव्हे तर विरोधी आमदारांचादेखील यात मोठय़ा प्रमाणावर समावेश होता.

राजकारणाच्या आखाडय़ात ‘जॅकेट’च्या या ‘फॅशन’वरही भिन्न राजकीय विचारधारांचा प्रभाव जाणवत असून कुणी या जॅकेटला ‘मोदी जॅकेट’ तर कुणी ‘नेहरू जॅकेट’ संबोधत आहेत. विशेष म्हणजे, यावरून आमदारांमध्ये चक्क दावे-प्रतिदावे होत असल्याचं चित्र नागपूरात दिसून येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.