winter session 2014

आमदार हर्षवर्धन जाधवांनी पोलिसांच्या कानशिलात लगावली

शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधवांनी पोलीस अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना पुढे आलीय. नागपूरात आमदार जाधवांनी शिवसेना पक्षप्रमुखांना भेटायला गेले असता हा प्रताप केल्याचं कळतंय.

Dec 17, 2014, 11:08 PM IST

कोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी चार अधिकाऱ्यांचं निलंबन

राज्यातल्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी युती सरकारनं कारवाईचा धडाका सुरू केल्याचं चित्र दिसतंय. याची सुरूवात कोंढाणे धरण घोटाळ्यापासून सुरू करण्यात आलीय. कोंढाणे धरणाच्या घोटाळ्याप्रकरणी सिंचन खात्याच्या चार अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी नागपुरात ही घोषणा केली.

Dec 17, 2014, 09:18 PM IST

दुष्काळग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून 7 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं 7 हजार कोटींच्या पॅकेज जाहीर केलंय. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत याबाबत घोषणा केलीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं तीन महिन्याचं वीज बिल आणि पीक कर्जावरील व्याज माफ करण्याचीही घोषणा करण्यात आलीय. 

Dec 11, 2014, 04:22 PM IST

‘नेहरू की मोदी’ आव्हाडांची जॅकेटवरून ‘आयडियाची कल्पना’!

विधीमंडळ अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडायचे असतात, याचाच विसर आमच्या लोकप्रतिनिधींना पडलाय की काय...? आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचंच उदाहरण घ्या... नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी काहीही कारण नसताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांवरून नसता वाद ओढवून घेतला.

Dec 9, 2014, 03:52 PM IST

हिवाळी अधिवेशन : चहापानाला ना मुख्यमंत्री ना विरोधक

राज्यात सध्या विरोधी पक्षचं अस्तित्वात नसल्याने एक विचित्र परिस्थिती निर्माण झालली आहे.

Dec 6, 2014, 06:41 PM IST