मुंबई : पुणे एटीएसचे एसीपी भानूप्रताप बर्गे यांच्यासह कुटुंब उध्वस्त करणार असल्याची धमकी मिळालीय. ISISच्या नावानं हा धमकीचा मेल पाठवण्यात आलाय.
मुंबई पोलीस आयुक्तांना हा मेल मिळालाय. इंग्रजीमधून आलेला हा मेल खरोखरीच ISISकडून आलाय की, फेक आहे, या दिशेनं पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडून तपास केला जातोय.
पुणे एटीएस कार्यालयासमोर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
एटीएसच्या पुणे युनीटनं डिसेंबर २०१४ मध्ये ISISच्या संपर्कात आलेल्या एका १६वर्षीय मुलीचं समुपदेशन करून तिला परावृत्त केले होते. त्याच बरोबर मुंबई येथून गायब झालेल्यापैकी एकाला पुणे पथकानं शोधून काढलं होतं. त्यामुळे बर्गे इसिसच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.