१२ वीतील विद्यार्थ्याचा खून, खूनानंतर मृतदेह जाळला

जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात १२ वीत शिकणाऱ्या नीलेश बेटोदे या विद्यार्थ्याचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला

Updated: Jan 13, 2016, 11:13 AM IST
१२ वीतील विद्यार्थ्याचा खून, खूनानंतर मृतदेह जाळला title=

जळगाव : जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात १२ वीत शिकणाऱ्या नीलेश बेटोदे या विद्यार्थ्याचा निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला

जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री या गावात हा प्रकार आहे.  नीलेश हा फत्तेपुर येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी होता. धारदार शस्त्राने त्याचा खून केल्यानंतर अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडलाय. 

सोमवारी शाळेतून परत आल्यानंतर रात्री कोण्याच्या तरी बोलवण्यावर नीलेश घराबाहेर गेला. तो परत आलाच नाही. शोधाशोध केल्यानंतर सकाळी एका शेताजवळ नीलेशचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. खून कशा मुळे झाला याचा पोलीस शोध घेत आहेत.