पुण्यातील हॉ़रर किलिंग सीसीटीव्हीत कैद

पुण्यातील गँगवारच्या घटना ताज्या असतनाच एका तरुणाचा प्रेम विवाह केल्याच्या कारणावरुन खून करण्यात आल्याची घटना घडली. 

Updated: Jan 8, 2015, 11:13 PM IST
 पुण्यातील हॉ़रर किलिंग सीसीटीव्हीत कैद title=

पुणे : पुण्यातील गँगवारच्या घटना ताज्या असतनाच एका तरुणाचा प्रेम विवाह केल्याच्या कारणावरुन खून करण्यात आल्याची घटना घडली. 

सचिन प्रल्हाद शिंदे या 27 वर्षाच्या तरुणाचा त्याच्या मेहूण्यानेच खून केलाय. अंगाचा थरकाप उडवून देणारी ही घटना मंगळवारी रात्री वारजे पुलाखाली घडली. त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाली. 

सचिन हा रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होता. त्याचा आरोपी शुभम धावडे याच्या बहिणीसोबत प्रेमविवाह झाला होता. शुभमला तो मान्य नव्हता. त्यामुळे त्याने साथीदारांच्या मदतीने सचिनचा काटा काढला. 

सचिनवर तब्बल 28 वार करण्यात आले तसेच पिस्तूलातून गोळ्या देखील झाडण्यात आल्या. या प्रकरणी वारजे प्रकरणी 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.