सिंहस्थ कुंभमेळावा शाही मार्ग तिढ्यावर तोडगा

सिंहस्थ कुंभमेळाच्या आयोजनातील कळीचा मुद्दा ठरणाऱ्या शाही मार्गाच्या तिढ्यावर आज तोडगा निघाला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शाधू महंत, लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत मध्यममार्ग निवडण्यात आलाय.

Updated: Jan 8, 2015, 09:03 PM IST
सिंहस्थ कुंभमेळावा शाही मार्ग तिढ्यावर तोडगा   title=

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळाच्या आयोजनातील कळीचा मुद्दा ठरणाऱ्या शाही मार्गाच्या तिढ्यावर आज तोडगा निघाला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शाधू महंत, लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत मध्यममार्ग निवडण्यात आलाय.

गेल्या कुंभमेळ्यावेळी जुन्या शाही मार्गावर चेंगराचेंगरीत २९ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हा नवीन मार्गाचा अवलंब करावा असा आग्रह प्रशासनाचा होता. मात्र साधू महंत आणि प्रशासन यांच्यात गेल्या १२ वर्षात सहमती झाली नव्हती. त्यावर आज तोडगा निघाला.

कुंभमेळ्यासाठी निधीवाटपावर अखेर एकमत झालंय. ७५ टक्के निधी राज्यसरकार तर २५ टक्के निधी नाशिक महापालिका खर्च करणार आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिलीय.

कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेली कामं लवकरात लवकर सुरू केली जाणार आहेत. कुंभमेळ्यासाठीच्या शाही मार्गाचा वादावरही तोडगा निघालाय. गणेशवाडीकडून साधूमहंत येणार आहेत. साधूमहंत, अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.