त्वचेविना जन्माला आलेल्या नागपुरातल्या 'त्या' बाळाचा मृत्यू

'हर्लेक्विन' नावाचा गंभीर आजार घेऊन जन्म घेतलेल्या त्या बाळाचा जन्मानंतर दोनच दिवसांनंतर मृत्यू झाला... आणि डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले. 

Updated: Jun 14, 2016, 10:54 AM IST
त्वचेविना जन्माला आलेल्या नागपुरातल्या 'त्या' बाळाचा मृत्यू title=

नागपूर : 'हर्लेक्विन' नावाचा गंभीर आजार घेऊन जन्म घेतलेल्या त्या बाळाचा जन्मानंतर दोनच दिवसांनंतर मृत्यू झाला... आणि डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले. 

'हर्लेक्विन' बाळ... 

नागपूरातील लता मंगेशकर रुग्णालयात शुक्रवारी रात्री एका महिलेने 'जेनेटिक डिसॉर्डर' असलेल्या एका 'हर्लेक्विन' बाळाला जन्म दिला होता. आठव्या महिन्यातच या मुलीचा जन्म झाला होता. त्याच्या शरीरावर त्वचेचा एकही थर नव्हता... 

सोमवारी खालावली तब्येत

सोमवारी सकाळपासून या मुलीची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्याला व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. या बाळानं सोमवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला.


हर्लेक्विन बेबी

शेतकरी कुटुंबात जन्म

विदर्भातल्या अमरावतीत राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबात या बालकानं जन्म घेतला होता. उल्लेखनीय म्हणजे, जन्म दिल्यानंतर या बाळाच्या आईला या बाळाला पाहण्यास परवनागी देण्यात आली नव्हती. सोमवारी सायंकाळी मानसोपचारतज्ज्ञांच्या उपस्थित या आईनं आपल्या बाळाला पाहिलं. 

कसं दिसत होतं हे बाळ

जन्माच्या वेळी या बाळाचं वजन १.८ किलोग्रॅम होतं. या जन्मत: भ्रुणाला कान नव्हते तसंच दृष्टीही नव्हती. या भ्रुणाच्या डोळ्यांच्या ठिकाणी केवळ दोन लाल गोळे आणि नाकाच्या ठिकाणी दोन छोटे छिद्र होते.  

अशा बालकांना लवकर संसर्गरोग होण्याची शक्यता असते. यापूर्वी पाकिस्तानमध्ये १९८४ साली अशा प्रकारचं बाळ जन्माला आलं होतं. ते वयाच्या २४ व्या वर्षांपर्यंत जिवंत होतं.