चोरुन गुटखा विक्री, रोहा येथे भरलेला कंटेनर जप्त

बंदी असली तरी राज्याच्या अनेक भागात गुटखा मोठया प्रमाणात चोरून विकला जातोय. रायगड जिल्हयाच्या रोहा तालुक्यातील बाहे येथील तरूणांनी गावाशेजारीच असलेला गुटख्यानं भरलेला कंटेनरच पकडून दिला.

Updated: May 25, 2016, 10:12 AM IST
चोरुन गुटखा विक्री, रोहा येथे भरलेला कंटेनर जप्त title=

रायगड : बंदी असली तरी राज्याच्या अनेक भागात गुटखा मोठया प्रमाणात चोरून विकला जातोय. रायगड जिल्हयाच्या रोहा तालुक्यातील बाहे येथील तरूणांनी गावाशेजारीच असलेला गुटख्यानं भरलेला कंटेनरच पकडून दिला.

गावातील तरूण क्रिकेट खेळत असताना त्यांना गावाजवळ असलेल्या कंटेनरमध्ये काहीतरी संशयास्पद हालचाली आढळून आल्या. गुटख्याचा वास आल्यानं त्यांचा संशय अधिकच बळावला. 

दोन तरूणांना धारेवर धरल्यानंतर त्यांनी कंटेनरमधील गुटखा दाखवला. त्यानंतर ग्रामस्थांनी रोहा पोलीसांना पाचारण केलं. पोलिसांनी कंटेनरची तपासणी केल्यानंतर या दोन तरूणांसह टेम्पो, गुटख्यानं भरलेला कंटेनर आणि एक कार ताब्यात घेतली.