प्रेमाच्या उत्सवासाठी 'गुलशनाबाद' सज्ज!

प्रेमाच्या दिवसाच्या तयारी सगळ्या जगभरात सुरू आहे. कारण, या प्रेमवेड्यांना वेध लागलेत १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेन्टाईन डेचे...

Updated: Feb 12, 2015, 03:53 PM IST
प्रेमाच्या उत्सवासाठी 'गुलशनाबाद' सज्ज! title=

नाशिक : प्रेमाच्या दिवसाच्या तयारी सगळ्या जगभरात सुरू आहे. कारण, या प्रेमवेड्यांना वेध लागलेत १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेन्टाईन डेचे...

प्रेमाचा हाच उत्सव साजरा करण्यसाठी जशी तरुणाई सज्ज झालीय तसचं नाशिकचं 'गुलशनाबाद' हे नाव सार्थ ठरविणाऱ्या शेतकऱ्यांचीही लगबग सुरु आहे. 

जिल्ह्यातील जानोरी, आंबे मोहाडी मखमलाबाद, दिंडोरी ही गावं प्रामुख्याने फुलशेतीसाठी ओळखली जातात. तर नाशिकचे गुलाब परदेशात पाठवून जानोरी, मोहाडी आंबे गावच्या शेतकऱ्यांनी जगाच्या नकाशावर आपल्या मखमली गुलाबांचा झेंडा मोठ्या डौलाने फडकाविलाय. 

प्रेमाचा हा दिवस साजरा करण्यासाठी नाशिकचे गुलाब अमेरिका, हॉलंड, जपानमध्ये जाण्यसाठी सज्ज झालेत. यंदा दोनशे हेक्टर क्षेत्रावर गुलाबाची शेती फुलविण्यात आली होती. सध्या नाशिकमधून दर दिवशी साधारण ५० हजार गुलाब परदेश वारीला जात आहेत  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.