कोल्हापूर : प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कॉम्रेड गोविंद पानसरेंना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय.
कॉम्रेड पानसरेंवर मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार करण्यात येणार आहेत. पानसरे यांना एअर अँम्ब्युलन्सनं मुंबईला नेण्यात आलंय.
गोविंद पानसरे यांच्यावर गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूरच्या अॅस्टर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांना ते सकारात्मक प्रतिसाद देत होते. मात्र, पुढील उपचार मुंबईतच करण्यात यावेत, असा सरकारनं पानसरे कुटुंबीयांसमोर प्रस्ताव ठेवला होता.
पानसरे कुटुंबीयांनीही डॉक्टरांनी सुचवल्यास मुंबईत उपचार करण्याची हरकत नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं पानसरेंवर पुढील उपचार मुंबईत करण्यात येणार आहेत.
दरम्यान, आरोपींचं स्केच तयार झाल्यामुळं तापासाला गती येणार असल्याची आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलीय.
गोविंद पानसरेंना कोल्हापूरच्या हॉस्पीटलमधून हवलतानाची दृश्यं...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.