कल्याण-डोंबिवली मनपातून २७ गावं वगळली

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला धक्का देणारा निर्णय सरकारने घेतला आहे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावं वगळण्यात आली आहेत. निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Updated: Sep 7, 2015, 11:13 PM IST
कल्याण-डोंबिवली मनपातून २७ गावं वगळली title=

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला धक्का देणारा निर्णय सरकारने घेतला आहे, कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावं वगळण्यात आली आहेत. निवडणुकीत याचा फटका शिवसेनेला बसणार असल्याचं सांगण्यात येतंय.

२००२ साली महापालिकेतून कल्याणजवळील २७ गावं  वगळण्यात आली होती. मात्र डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गावं कल्याण-डोंबिवली पालिकेत समाविष्ट केली जातील असे जाहीर केले होते.  तसा जीआर देखील १५ दिवसांपूर्वीच काढण्यात आला. त्यानुसार पालिकेच्या निवडणुकीचं आयोजनही करण्यात आलं होतं. परंतु २७  गावांतील संघर्ष समितीचा या निर्णयाला विरोध कायम होता. 

आता मुख्यमंत्र्यांनी ही २७ गावं कल्याण-डोंबिवली पालिकेतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गावांचा पालिकेमध्ये समावेश झाल्यास निवडणुकीत त्याचा फटका भाजपलाही बसण्याची जास्त शक्यता असल्याने, ही गावं पुन्हा वगळण्यात आल्याची चर्चा  कल्याणमध्ये आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.