बालदिनाच्या निमित्तानं... पुण्याची वैदेही ठरली आजची 'डुडल गर्ल'!

डुडल फॉर गुगल या गुगल इंडियाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुण्याच्या वैदेही रेड्डी या विद्यार्थिनीने बाजी मारलीय. सलग दुसऱ्यांदा पुण्यातील विद्यार्थिनीनं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. 

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 14, 2014, 09:44 AM IST
बालदिनाच्या निमित्तानं... पुण्याची वैदेही ठरली आजची 'डुडल गर्ल'! title=

पुणे : डुडल फॉर गुगल या गुगल इंडियाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये पुण्याच्या वैदेही रेड्डी या विद्यार्थिनीने बाजी मारलीय. सलग दुसऱ्यांदा पुण्यातील विद्यार्थिनीनं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. 

बालदिनाच्या निमित्तानं दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी गुगल इंडियातर्फे ही स्पर्धा घेतली जाते. स्पर्धेतल्या विजेत्या विद्यार्थ्याचं डुडल बालदिनी गुगलच्या होमपेजवर टाकलं जातं. त्यामुळे, आजच्या बालदिनी वैदेहीचं डुडल गुगल इंडियाच्या होमपेजवर झळकताना दिसतंय. 

यंदा गुगलनं विद्यार्थ्यांना ‘भारतातलं मला भेट द्यायला आवडेल असं ठिकाण’ अशा थीमवर चित्र रंगवायला सांगितलं होतं. वैदेहीनं आपल्या चित्रात ‘कलरफूल’ आणि सौंदर्यशास्त्रात श्रीमंत असणारं राज्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आसामचं चित्र रंगवलं. या स्पर्धेत भारतातल्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता... त्यातून १२ जण निवडले गेले... आणि त्यामध्ये वैदेहीनं पहिला क्रमांक पटकावला. 'नैसर्गिक आणि सांस्कृतिक नंदनवन - आसाम' या चित्राला पहिलं पारितोषक मिळालंय आणि हेच आहे गुगलचं आजचं डुडल... 

गुगल इंडियातर्फे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १४ नोव्हेंबरला गुगल आपल्या डुडल स्पर्धेच्या माध्यमातून हा दिवस साजरा करतं. यंदा पंडित जवाहरलाल नेहरु यांची १२५ वी जयंती आहे. अशी स्पर्धा आयोजित करण्याचं गुगलचं हे सहावं वर्ष आहे. 

पुण्याच्या याच डुडल गर्लशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.