मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भाग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे काहीप्रमाणात दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. गणपती बाप्पा पावल्याचे प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : नाशिकमध्ये जोरदार पाऊस आणि कुंभनगरीत तिसरे शाहीस्नान
राज्यात पुणे, नाशिक, औरंगाबद, जळगाव, धुळे, जालना, चंद्रपूर आदी ठिकाणी चांगला पाऊस बरसलाय. पुणे शहरातही पावसाने हजेरी लावली. तर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट बाप्पाने दूर केलेय, अशी सर्वसामान्यांतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अधिक वाचा : 'दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय?'
गोदातीरावरून वाहून जाणाऱ्या दोघांना वाचविण्यात यश आलेय. नाशिकमध्ये पावसामुळे गोदापात्राची पाणी पातळी वाढली असून पात्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास शाही मिरवणूक उशिरा निघण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. तर पावसामुऴे पंचवटी भागात काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
औरंगाबादमध्ये अपेक्षापेक्षा जास्त पाऊस झालाय. औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळळ दुष्काळग्रस्त या भागाला मोठा दिलासा मिळतोय. औरंगाबाद शहर सह ग्रामीण भागात सुद्धा पावसाचा चांगला जोर आहे. तर जालना परभणी अणि बीड च्या काही भागात सुद्धा दमदार पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील काही नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच विदर्भातही पावसाचा जोर आहे. चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने आज झोडपले. त्यामुळे जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये दमदार हजेरी
पिंपरी चिंचवड मध्ये आज पहाटेपासून पावसानं दमदार हजेरी लावली. शहराच्या सर्वच भागात दमदार पाऊस पडत आहे. दोन तीन दिवसांपूर्वी शहरात पाऊस पडला असाला तरी त्याचं प्रमाण अत्यंत कमी होत. पण आज पावसान चांगलीच हजेरी लावल्यान शहरवासीय चागलेच सुखावलेत. दरम्यान शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातही पाऊस पडतोय.
येवल्यात मुसळधार
येवला शहरासह तालुक्यात गुरुवारी रात्री उशीरापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी सुध्दा पावसाची झड लागलेली असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. शुक्रवारी पहाटे जोरदार वाऱ्यासह पाऊसाने जोर पकडला, या पाऊसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी विहिरीत पाणी उतरण्यासाठी अजून जोरदार पाऊसाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.