पुण्यात महिला असुरक्षितच

पुण्यातील तरुणींना कोणते कपडे घालावेत ? कधी घराबाहेर पडावे?  कोणासोबत फिरायला जावे ? यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालंय.

Updated: May 9, 2016, 08:32 PM IST
पुण्यात महिला असुरक्षितच title=

पुणे: पुण्यातील तरुणींना कोणते कपडे घालावेत ? कधी घराबाहेर पडावे?  कोणासोबत फिरायला जावे ? यावर प्रश्न चिन्ह निर्माण झालंय. कारण  पुणे शहरात घटनाचं तशी घडली आहे. पहाटे साडेपाच सहा वाजता मित्रांसोबत घरी परतणा-या एका 22 वर्षांच्या तरुणीची छेड काढून तिला मारहाण करण्यात आली.

ही घटना 1 मेच्या पहाटे घडली आहे. मित्राच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करुन ही तरुणी पहाटे साडे पाच वाजता दोन मित्रांसोबत घरी जात होती. त्यांची कार लुल्ला नगर परिसरात एका सिग्नलवर आली, तेव्हा पाठीमागून एक कार आली आणि त्या कारमधील तरुणांनी या तरुणीची छेड काढण्यास सुरुवात केली.

योगेश चौगुले, अमित मुखेडकर आणि शुभम गुप्ता यांच्यावर ही मारहाण केल्याचा आरोप आहे. या पीडित मुलीनं जेव्हा मारहाणीचा जाब विचारला तेव्हा आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांनी धक्कादायक उत्तर दिलं. आमच्या घरातील मुली असे कपडे घालून सकाळी फिरायला जात नाहीत, असं ते मला म्हणाल्याचं वक्तव्य या तरुणीनं केलं आहे.