पुण्यात पुन्हा गॅंगवार, गुंडावर गोळीबार

पुण्यात रविवार पेठेतल्याकस्तुरी चौकात सराईत गुंड अजय शिंदे याच्यावर बुधवारी संध्याकाळी गोळीबार झाला. भररस्त्यातला हा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय. 

Updated: Mar 19, 2015, 03:56 PM IST
पुण्यात पुन्हा गॅंगवार, गुंडावर गोळीबार title=

पुणे : पुण्यात रविवार पेठेतल्याकस्तुरी चौकात सराईत गुंड अजय शिंदे याच्यावर बुधवारी संध्याकाळी गोळीबार झाला. भररस्त्यातला हा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालाय. 

या गोळीबारात अजय शिंदे बचावला, मात्र त्याच्याबरोबर असलेली महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

अन्य तीन आरोपी फरार आहेत. कुणाल पोळ याचावर्षभरापूर्वी खून झाला होता. त्याचा सूड घेण्यासाठी अजय शिंदेवर हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.