जळगाव : मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजप उमेदवार देणार नाही, या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने एका दगडात अनेक पक्षी मारलेच गेले नाही तर ते सैरभैर झालेत अशी प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव मध्ये दिली.
परिपक्वतेची ही भूमिका असून मुख्यमंत्र्यानी बाऊंड्री पलीकडे षटकार लगावलाय असंही खडसे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापौर निवडणुकीतील भाजपची भूमिका स्पष्ट केली.
भाजप महापौर, उपमहापौरपदासह स्थायी समितीची निवडणूक लढवणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भाजपच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचा महापौरपदाचा मार्ग मोकळा झालाय. पारदर्शकतेच्या मुद्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री फडणीवस यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही प्रकारची तडजोड करून आम्हाला महापौर पदाच्या शर्यतीत उतारायचं नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं