रत्नागिरी : महाराष्ट्रासह देशभरात उत्साहानं साजरा केला जाणारा होळी सण आता अवघ्या एका आठवड्यावर येऊन ठेपलाय.
कोकणात तर आधीपासूनच पारंपारिक होलिकोत्सवाला धुमधडाक्यात सुरवात झाली आहे. फागपंचमीच्या महुर्तावर कोकणात शिवरीची झाड तोडून वाडीवाडीत होळी उभी करण्याची प्रथा आहे.
याच प्रथेनुसार होळी आणताना ढोलताशांच्या गजरात होळीचं झाड नाचवत होळीचं स्वागत केलं जातं. त्यानंतर होळी उभी करुन विधिवत तिची पूजा करुन होळी भोवती होम पेटवण्यात येतात. त्यावेळी खास मालवणी शैलीतल्या फाकांनी गावागावात होलिकोत्सव साजरा केला जातो.