'बातम्या छापून आणण्यासाठी पाकिटं पाठवावी लागतात'

वर्तमान पत्रात बातम्या छापून आणण्यासाठी पाकिटं पाठवावी लागतात, असं धक्कादायक वक्तव्य महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलय. 

Updated: Feb 1, 2016, 01:37 PM IST
'बातम्या छापून आणण्यासाठी पाकिटं पाठवावी लागतात' title=

जळगाव : वर्तमान पत्रात बातम्या छापून आणण्यासाठी पाकिटं पाठवावी लागतात, असं धक्कादायक वक्तव्य महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलय. 

जळगावमध्ये लेवा शक्ती मासिक प्रकाशन सोहळा प्रसंगी ते बोलत होते. वर्तमान पत्रात बातमी छापून आणण्यासाठी सर्वच कराव लागतं. 

बातमी छापून आली नाही तर पाकीट पाठवून देतो असं आपणही केलय, असा खुलासा खडसे यांनी जाहीर भाषणात केलाय.