कोल्हापुरात गॅस वितरकांवर मोठी कारवाई

कमी वजनाच्या सिलिंडर देणाऱ्या गॅस वितरकांवर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

Updated: Feb 1, 2016, 11:20 AM IST
कोल्हापुरात गॅस वितरकांवर मोठी कारवाई title=

कोल्हापूर : कमी वजनाच्या सिलिंडर देणाऱ्या गॅस वितरकांवर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.

सिलिंडर विक्रेत्यांनी मापात पाप केले, तर त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. 

कोल्हापुरात सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र विभागाने सिलिंडर वितरकांवर केलेल्या कारवाईतून दाखवून दिले आहे. 

वजनमापाचा वापर टाळणाऱ्या, अचूक वजनमापाचा वापर न करणाऱ्या आणि कमी वजनाचे सिलिंडर पुरवठा करणारे जिल्ह्यातील २२ वितरक तपासणी मोहिमेत सापडले आहेत.
 
गॅस सिलिंडर हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. वितरकांनी ठरवून दिलेल्या वजनाचे सिलिंडर ग्राहकांना देणे बंधनकारक आहे. त्यासाठी सिलिंडरचे वजन करण्यासाठी तोलन उपकरणे एजन्सीमध्ये ठेवण्याबरोबर ते घरपोच देणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत असलेच पाहिजेत. 

याबाबतच्या अनेक तक्रारी सहायक नियंत्रक वैधमापनशास्त्र विभागाकडे येऊ लागल्या. त्यामुळे प्रमाणित वजानापेक्षा कमी वजनाचे एलपीजी गॅस सिलिंडर विकणाऱ्याविरोधात वैधमापन शास्त्र विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली. 

अचूक वजन मापे ठेवण्याबरोबर त्यांचे वेळेत नूतनीकरण करून घेणे सक्तीचे आहे; पण त्याची काटेकोर अंमलबजावणी सध्या वितरकांकडून केली जात नसल्याच्या तक्रारी होत्या.