नाशिकमधील तरुणांवर ISISचा प्रभाव, सोशल मीडियावर पाठराखण

 मुंबई, पुणे बंगळूरू सारख्या मोठ्या शहरातील काही तरुणांवर आयसीसचा असणारा प्रभाव आता नाशिकपर्यंत येवून पोहचलाय की काय असा संशय व्यक्त होतोय. 

Updated: Jan 2, 2016, 02:38 PM IST
नाशिकमधील तरुणांवर ISISचा प्रभाव, सोशल मीडियावर पाठराखण title=

नाशिक : मुंबई, पुणे बंगळूरू सारख्या मोठ्या शहरातील काही तरुणांवर आयसीसचा असणारा प्रभाव आता नाशिकपर्यंत येवून पोहचलाय की काय असा संशय व्यक्त होतोय. 

सोशल मीडियाद्वारे आयसीस या दहशतवादी संघटनेची पाठराखण करणाऱ्या अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्यांची नाशिक पोलिसांनी चौकशी केली  आहे. सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका कंपनीत कार्यरत असणाऱ्या या तरुणाच्या काही आक्षेपार्ह पोस्ट व्हॉटसअपवर व्हायरल झाल्यानं शहरात एकाच खळबळ उडाली. 

नाशिक पोलीसानी तातडीने याची दखल घेत तरुणाची चौकशी केली असता सध्यातरी पोलीस चिंता करण्याचं कारण नसल्याच सांगतायत. असं असलं तरी, या प्रकरणाची पुरेपूर खबरदारी घेतली जात असून सोशल मीडियावर लक्ष ठेवलं जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.