जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'ऑर्डर' देणाऱ्या भिडे गुरुजींनी आता मुख्यमंत्र्यांचं विमानालाही काही काळ थांबवण्यासाठी भाग पाडलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्ताईनगरच्या एका कार्यक्रमासाठी जळगावात दाख ल झाले होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही त्यांच्यासोबत होते. कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी मुख्यमंत्री आपल्या विमानाच्या दिशेने रवाना झाले. ते विमानात जाऊन बसलेही... पण तरीही उ्डाडाणासाठी विमानाला काही काळ थांबावं लागलं, कारण भिडे गुरुजी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तिथं उपस्थित झाले होते.
अधिक वाचा - पंतप्रधान मोदींना 'ऑर्डर' देणारा हाच तो मराठी माणूस....
शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संभाजीराव भिडे गुरुजींना जळगावात मुख्यमंत्री आल्याचं कळताच ते तातडीनं विमानतळावर दाखल झाले होते. योगायोगानं त्यांचाही जळगावात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे ते तिथंच होते. मुख्यमंत्री इथंच असल्याचं समजताच त्यांनी तातडीनं मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला आणि ते विमानतळावर दाखल झाले.
मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी भिडे गुरुजींनी धावपट्टीकडे धाव घेतली... हे पाहून विमानतळाचे सुरक्षा अधिकारीही भिडे गुरुजींच्या मागे धावले... आणि मग गिरीश महाजन, सुरेश भोळे यांनीदेखील विमानाकडे धाव घेतली.
अधिक वाचा - भिडे गुरुजींवरील आरोप सहन करणार नाही : उदयनराजे
साताऱ्यातल्या गडावरच्या एका आपल्या कार्यक्रमाचं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी भिडे गुरुजी आले होते.
'भिडे गुरुजींनी मला इथं आमंत्रित केलेलं नाही तर मी त्यांच्या हुकूमावरून इथे आलोय' असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी लोकसभेदरम्यान महाराष्ट्रातील एका रॅलीत केलं होतं. त्यामुळेही भिडे गुरुजी चर्चेत आले होते.