'ड्रंक ड्रायव्हर'चा पोलिसावर जीवघेणा हल्ला

पोलिसांवरील हल्ल्याचं सत्र थांबता थांबत नाहीय.

Updated: Sep 17, 2016, 11:47 AM IST
'ड्रंक ड्रायव्हर'चा पोलिसावर जीवघेणा हल्ला  title=
ही दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतात

नागपूर : पोलिसांवरील हल्ल्याचं सत्र थांबता थांबत नाहीय.

नागपूरच्या गणेशपेठजवळ प्रकाश बारंगे या वाहतूक शिपायावर हल्ला करण्यात आलाय. 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' कारवाई दरम्यान एका दुचाकीस्वाराने बारंगे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

हेल्मेट आणि दगडाने बारंगे यांच्यावर मारेकऱ्यानं हल्ला केला. यानंतर, हा हल्लेखोर फरार झालाय.  

या हल्ल्यात बारंगे रक्तबंबाळ झालेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.