नागपूर : सरकारी डॉक्टरांचा संप आता रुग्णांच्या जीवावरच उठलाय. नागपूरमध्ये डॉक्टरांच्या बेमुदत संपामुळं दोन जणांचा बळी गेलाय.
नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड तालुक्यात आज पहाटे एक रुग्णवाहिका समोरून येणाऱ्या एका ट्रेलरला धडकली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैंकी प्रवीण कुंभारे आणि चेतन निनावे यांना तातडीनं जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं होतं... पण, त्यांचं दुर्देव आणि डॉक्टरांचा संप आड आला...
हॉस्पीटलमध्ये दाखल झाल्यानंतरही डॉक्टरांच्या संपामुळं या दोघांवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळं त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथेही त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यानं त्यांचा अखेर दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय.
आकस्मिक विभागात आणल्यानंतर बराच वेळ दोघंही स्ट्रेचरवर तडफडत होते... पण, त्यांच्याकडे लक्ष द्यायला एकही डॉक्टर पुढे आला नाही. त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच या दोघांना आपला जीव गमवावा लागला, असं प्रवीण आणि चेतन यांच्या नातेवाईकांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.