नाशिक : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागात झालेल्या अनेक घोटाळ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. २२ ते २५ टक्के घेतल्याने घोटाळे झाल्याचे सांगत मलाही टक्केवारी देण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी यांनी केला.
काँग्रेस आघाडीच्या काळातील सर्व गैरव्यवहारांचा तपशील दोन आठवड्यांत जाहीर करण्यात येईल, असे जलसंपदामंत्री महाजन यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे सांगितले. जलसंपदा विभागातील ११०० कोटींची कामे बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. ही सर्व कामे थांबविण्यात आली आहेत, असे ते म्हणालेत.
विश्वास बसणार नाही अशा काही गोष्टी या चौकशीतून बाहेर येतील. आघाडी सरकारच्या काळात हे खातं बदनाम झालं आहे. ती प्रतिमा बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच कंत्राटदारांकडून १०० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे महाजन म्हणालेत.
मला प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष पद्धतीने लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. पुण्यातील एका कंत्राटदाराने २२ टक्के देऊ केले होते, असा गौप्यस्फोट महाजन यांनी यावेळी केला. महाजन यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुनील तटकरे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते या विभागचे मंत्री राहिले आहेत. त्यांच्या काळात घोटाळे झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.