नाशिक, औरंगाबाद : नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने आज हजेरी लावली. नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, विदर्भातील बुलडाणा, अमरावती, नागपूर, आणि कोकणातही पाऊस पडला.
कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यामुळे रब्बी पिकांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. शिवाय बळीराजा चिंताग्रस्त आहे.
नाशिक आणि नागपूरमध्ये चांगला पाऊस पडल्याने शेतीचे नुकसान झालेय.याआधी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळवलं होतं. आता २०१५ च्या सुरुवातीलाही पाऊस पडल्याने शेतकरी चिंताग्रत झालाय.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडला. पुणे वेध शाळेने राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडले, असा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.