दलित हत्याकांड : आणखी चार जणांची नार्कोटेस्ट?

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड्याच्या दलित हत्याकांड प्रकरणी आता आणखी चौघांची नार्को चाचणीची परवानगी मागण्यात येणार आहे. पोलीस याबाबत पाथर्डी कोर्टाकडे परवानगी मागणार आहेत.

Updated: Nov 21, 2014, 10:50 AM IST
दलित हत्याकांड : आणखी चार जणांची नार्कोटेस्ट? title=

अहमदनगर : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील जवखेड्याच्या दलित हत्याकांड प्रकरणी आता आणखी चौघांची नार्को चाचणीची परवानगी मागण्यात येणार आहे. पोलीस याबाबत पाथर्डी कोर्टाकडे परवानगी मागणार आहेत.

याआधीच सहा संशयितांची नार्को चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झालाय.  दरम्यान या हत्याकांडाला एक महिना झालाय. मात्र अद्यापही मारेकरी मोकाटच आहेत.

ऐन दिवाळीच्या धामधुमीत पाथर्डी तालुक्यात ह्रद्य हेलावून टाकणारी ही घटना घडली होती. एकाच दलित कुटुंबातील आई, वडील आणि तरूण मुलगा यांचे तुकडे करून मृतदेह विहिरीत टाकून देण्यात आले होते. या हत्याकांडाला आज एक महिना पूर्ण झाला मात्र अद्यापही आरोपी मात्र मोकाटच आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.