ठाणे : मुब्य्रातील काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या मुलगा प्रणेश पाटील याचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झालाय.
प्रणेश मुंब्र्याहून माजिवाड्याला पेट्रोल भरण्यासाठी येत असताना ही घटना घडली. प्रणेश हा २० वर्षांचा होता. रविवारी हा अपघात झाला होता.
मुंब्र्यातील मेक कंपनीसमोर राहणारा प्रणेश झिबेर शरीफ या मित्रासोबत रात्री ११.३० च्या सुमारास मुंब्रा इथून माजिवाड्याकडे बाईकने पेट्रोल भरण्यासाठी जात होता. त्यावेळी रेतीबंदर भागात कंटेनरखाली येऊन तो गंभीर जखमी झाला होता.
प्रणेश या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचार करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. कंटेनरचा चालक भगवान जगदाळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
स्टंटचा नाद
दुर्दैवी अपघातात मरण पावलेल्या प्रणेश याच्याकडे चार अत्यंत महागड्या स्पोर्ट बाईक होत्या. त्यास भरधाव वेगात बाईक चालवून स्टंट करण्याचा छंद होता. त्याने बाईकवर स्टंट करतानाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर टाकले होते. मात्र, दुचाकी अपघातातच त्याचा मृत्यू झाला.