दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस

मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

Updated: Aug 23, 2015, 11:02 PM IST
दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

दुष्काळात मराठवाड्यातील जनतेला आधार देण्यासाठी नियोजन पूर्ण झालंय तातडीनं जनावरांसाठी चारा,पिण्यासाठी पाणी,कमी दरात धान्य,आणि रोजगार देण्यासाठी राज्यसरकार आणि प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनविस यांनी दिलीय. 

केंद्र सरकारकडून दुष्काळ निवारणासाठी ५५६ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून भविष्यात आणखी निधी मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेणार असून या बैठकीत दिर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करु असे त्यांनी सांगितलं.   

दुष्काळात मजूरांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामं हाती घेण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. जनावरांसाठी चारा आणि पाणी मिळन गरजेचं आहे. त्यामुळे सामजिक संघटनांनी चारा छावण्या काढण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.