भटक्या कुत्र्यांनी कोवळ्या जीवाचे लचके तोडले

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एका दीड वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेल्याची हृद्यद्रावक घटना पुण्यातल्या मुळशी तालुक्यात घडलीय. 

Updated: Feb 13, 2016, 10:53 PM IST
भटक्या कुत्र्यांनी कोवळ्या जीवाचे लचके तोडले title=

पुणे : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन एका दीड वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेल्याची हृद्यद्रावक घटना पुण्यातल्या मुळशी तालुक्यात घडलीय. 

माणगावमध्ये बोडकेवाडी परिसरात या घटनेनं एकच खळबळ उडवून दिलीय. या चिमुरड्याचे आई-वडील याच परिसरात एका वीटभट्टीवर काम करतात.  

मूळचं कर्नाटकातलं असलेलं नाटेकर कुटुंब पोटापाण्यासाठी इथं येऊन एका छोट्या झोपड्यात राहत आहे.... या झोपड्याला दारही नाही.

शुक्रवारी इतर आपल्या घरात झोपले असताना चिमुकला संदीपवर मात्र अचानक भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला... आणि या कोवळ्या जीवाचे त्याचे लचके तोडले. 

संदीपचा रडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील शावाप्पा नाटेकर धावत-पळत बाहेर आले. त्यांनी संदीपला रुग्णालयात दाखल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पण, हॉस्पीटलमध्ये पोहचण्यापूर्वीच संदीपचा मृत्यू झाला होता.