शिवाजी महाराजांच्या डुडलसाठी 'सोशल' मोहीम

शिवजयंती आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

Updated: Feb 13, 2016, 06:17 PM IST
शिवाजी महाराजांच्या डुडलसाठी 'सोशल' मोहीम title=

मुंबई: शिवजयंती आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिवजयंतीला गुगलच्या होम पेजवर शिवाजी महाराजांचं छायाचित्र डुडल म्हणून असावं यासाठी शिवप्रेमी जोरदार प्रयत्न करत आहेत. 

गुगलनं शिवाजी महारांजाचा डुडल तयार करावा यासाठी proposals@google.com या ई-मेलवर मेल पाठवले जात आहेत, तसंच महाराजांच्या डुडलसाठी goo.gl/FmTgNh या लिंकवर डुडला समर्थन देऊ शकतात. फेसबूक, ट्विटरवरही #DoodleofShivray या हॅशटॅगद्वारे ही मोहीम सुरु आहे.

खासदिनानिमित्त विज्ञान, इतिहास, साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, समाजकारण यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महान काम करणाऱ्या व्यक्तींचं गुगल आपल्या होम पेजवर डुडल बनवतं.