मुंबई-अहमदाबाद मार्गावर केमिकल टँकरला भीषण आग

मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात झालाय. एका केमिकल टँकरला झालेल्या अपघातात टँकरसह सहा गाड्यांनी पेट घेतलाय.

Updated: Dec 11, 2016, 03:10 PM IST
मुंबई-अहमदाबाद मार्गावर केमिकल टँकरला भीषण आग title=

पालघर : मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात झालाय. एका केमिकल टँकरला झालेल्या अपघातात टँकरसह सहा गाड्यांनी पेट घेतलाय.

या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येतीये. या दुर्घटनेमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आलीये.