शिर्डीत महिला चोरकडून ६९ हजार, ७ तोळे सोनं हस्तगत

 शनिवारी एका महिलेला पकडण्यात आलं. ही कुणी साधीसुधी महिला नसून एक अट्टल चोर आहे. तिच्याकडून 69 हजार रोख रक्कम आणि 7 तोळे सोनं हस्तगत करण्यात आलं. शिर्डीत जसे साईभक्त देशविदेशातून येतात. तसेच चोरही देशभरातून येत असतात. भक्तांचे पाकीटं रिकामी करण्याचं काम हे चोर लुटारू करतात.

Updated: Dec 11, 2016, 02:04 PM IST
शिर्डीत महिला चोरकडून ६९ हजार, ७ तोळे सोनं हस्तगत  title=

शिर्डी : शनिवारी एका महिलेला पकडण्यात आलं. ही कुणी साधीसुधी महिला नसून एक अट्टल चोर आहे. तिच्याकडून 69 हजार रोख रक्कम आणि 7 तोळे सोनं हस्तगत करण्यात आलं. शिर्डीत जसे साईभक्त देशविदेशातून येतात. तसेच चोरही देशभरातून येत असतात. भक्तांचे पाकीटं रिकामी करण्याचं काम हे चोर लुटारू करतात.

हैद्राबादहून वाय चंद्रशेखर हे साईभक्त कुटुंबासह शिर्डीत आले होते. दर्शनासाठी जात असताना त्यांच्यासोबतच्या महिलेची पर्स चोरीला गेली. पोलीस तक्रारीनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. त्यात चेरी कैद झाली होती. या फुटेजमध्ये महिलेचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी तिने परिधान केलेल्या पोशाखावरून तिचा शोध सुरू केला. ती महिला दिसताच तिला संशयित म्हणून नेले आणि तिची चौकशी केली आणि झडती घेतली. त्यावेळी तिच्याकडे सुमारे दोन लाख रुपये किमचीचे सोन्याचे दोन हार आणि 69 हजार रोख रक्कम सापडली. काही दिवसांपूर्वीच साई संस्थाननं पुढाकार घेत साध्या वेषातल्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली. या पथकानंच ही चोरी पकडली.