औरंगाबादमध्ये भर रस्त्यावर रासायिनक पदार्थांचा स्फोट

औरंगाबादच्या किराडपुरा भागात केमिकलचा ब्लास्ट होऊन दोन लहान मुलं जखमी झाल्याची घटना घडली. किराडपुरा भागात सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

Updated: Apr 8, 2017, 03:31 PM IST
औरंगाबादमध्ये भर रस्त्यावर रासायिनक पदार्थांचा स्फोट title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या किराडपुरा भागात केमिकलचा ब्लास्ट होऊन दोन लहान मुलं जखमी झाल्याची घटना घडली. किराडपुरा भागात सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. 

या घटनेत एफरा अनिस आणि वासिम खान यांच्या पायांना दुखापत झाली. सकाळी अकराच्या सुमारास वासिम खान आणि एफारा अनिस आझाद चौकातून पायी जात असताना रस्त्यावर पडलेल्या केमिकलचा स्फोट झाला. पाच मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झाले. 

सुतळी बॉम्बसारख्या आवाजापेक्षा थोडा मोठा आवाज या ब्लास्टचा होता. घटनेनंतर जखमी मुलांना तातडीने घाटी रुग्णालयात उचारासाठी पाठवण्यात आल आहे. घटनास्थळी एटीएसचे आणि फोरेन्सिकचे एक पथक पोहचले असून घटनेत घाबरण्याच कारण नसल्याच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केल.