कोकणात तापमानाचा पारा 40 अंशावर

राज्यातील अचनाक वाढलेलं तापमान हा सध्या गंभीर विषय बनत चाललाय... कोकणात सुद्धा तापमानाचा पारा 40 अंशावर पोहचला होता.

Updated: Apr 8, 2017, 01:58 PM IST
कोकणात तापमानाचा पारा 40 अंशावर  title=

रत्नागिरी : राज्यातील अचनाक वाढलेलं तापमान हा सध्या गंभीर विषय बनत चाललाय... कोकणात सुद्धा तापमानाचा पारा 40 अंशावर पोहचला होता.

कोकणालाही भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हं आहेत.  कोकणातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात ३ मोठे प्रकल्प आहेत.

प्रकल्पाची पाणीसाठवणुकीची क्षमता ७३३ दक्षलक्ष्य घनमीटर इतकी आहे... पण सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा झपाट्याने खाली जातोय. मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत घटलाय.

रत्नागिरीत एकूण 29 लहान मोठे प्रकल्प आहेत. त्यात गेल्यावर्षी 47.68 टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र ही पातळी 43.61 टक्क्यांवर आलाय. सिंधुदुर्गात 23 लहान मोठे प्रकल्प आहेत. त्यांच्या पातळीतही गेल्यावर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट झालंय.