मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अंधश्रद्धेतून तरुणाची हत्या

अंधश्रद्धेतून एका युवकाची हत्या झाल्याची घटना नागपुरातल्या कुही तालुक्यातील टेंभरी गावात घडलीय. अश्विन गयभिये असं या मृत तरुणाचं नाव आहे.

Updated: Nov 14, 2015, 11:41 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अंधश्रद्धेतून तरुणाची हत्या title=

नागपूर : अंधश्रद्धेतून एका युवकाची हत्या झाल्याची घटना नागपुरातल्या कुही तालुक्यातील टेंभरी गावात घडलीय. अश्विन गयभिये असं या मृत तरुणाचं नाव आहे.

१० नोव्हेंबरपासून अश्विन बेपत्ता होता. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना त्याच गावातील या विहिरीत त्याचा मृतदेह सापडला. सुरुवातीला गावातील वैमनस्यातून ही घटना घडल्याचा सर्वांचा समज झाला होता. मात्र, कुही पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता अघोरी प्रकार उघड झालाय.

गावातील नरेश मते नावाच्या व्यक्तीला सर्पदंश झाला होता. त्यावेळी त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी मांत्रिकाकडे नेण्यात आलं. योग्य उपचार न मिळाल्यानं नरेशचा मृत्यू झाला. मात्र, नरेशचा मृत्यू अपघाती नसून सदाशिव गजभिये या ६० वर्षीय व्यक्तीने घडवून आणल्याचा संशय मते कुटुंबीयांना झाला.

याचा बदला घेण्यासाठी सदाशिवचा मुलगा अश्विनला शेतावर बोलावून धारदार शस्त्राने हत्या करण्यात आलीय. या प्रकरणी कुही पोलिसांनी गुन्हा नोंदवत दोघांना अटक केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.