तुम्हीही स्मार्टफोन खिशात ठेवता, सावधान...

तुम्ही वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवत असाल तर सावधान… तो अगदी सहज पणे चोरीला जाऊ शकतो… पुण्यामध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या अश्याच भामट्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्याकडून जवळ पास दहा लाख रुपयांचे तब्बल १०६ मोबाईल हस्तगत करण्यात आलेत. विशेष म्हणजे हे सर्व स्मार्ट फोन आहेत.

Updated: Nov 14, 2015, 10:50 PM IST
तुम्हीही स्मार्टफोन खिशात ठेवता, सावधान...  title=

पुणे : तुम्ही वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवत असाल तर सावधान… तो अगदी सहज पणे चोरीला जाऊ शकतो… पुण्यामध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या अश्याच भामट्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केलीय. त्यांच्याकडून जवळ पास दहा लाख रुपयांचे तब्बल १०६ मोबाईल हस्तगत करण्यात आलेत. विशेष म्हणजे हे सर्व स्मार्ट फोन आहेत.

पुण्यातल्या मंडई, लक्ष्मी रोड या गर्दीच्या ठिकाणाहून चार जणांनी हे मोबाईल चोरलेत. फक्त दिवाळीच्या दरम्यान या चार भूरट्यांनी १०६ मोबाईलवर डल्ला मारलाय. प्रदीप बेटकरी, अनिल बेटकरी, किरण वडार, मारुती बेटकरी अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावं आहेत. हे चार जण अत्यंत शिताफीनं मोबाईल चोरी करायचे. चार जणांतला एक जण सावजाला बोलण्यात गुंतवायचा आणि दुसरा मोबाईल चोरी करायचा... तर बाकीचे गाडीवर तयार राहायचे. चोरी केली की ते पसार व्हायचे कोंढवा पोलिसांनी अखेर त्यांना अटक केलीय

मोबाईल चोरीला गेला की आशाच सोडून दिली जाते. मोबाईल परत मिळाल्यामुळं बऱ्याच जणांना आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय. या चार जणांबरोबर आणखी या चोऱ्यांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? आणि चोरीचे मोबाईल कोण खरेदी करत होतं याचाही पोलीस तपास करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.