कल्याणमध्ये बाळासाहेबांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण

कल्याणमध्ये होणा-या बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळाच्या अनावरणाला केंद्रीय निवडणुक आयोगाने विशेष परवानगी दिलीय. 

Updated: Jan 7, 2017, 08:25 AM IST
कल्याणमध्ये बाळासाहेबांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण title=

कल्याण : कल्याणमध्ये होणा-या बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळाच्या अनावरणाला केंद्रीय निवडणुक आयोगाने विशेष परवानगी दिलीय. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या पुतळ्याचं आज लोकार्पण होणार आहे. दरम्यान ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या कालच्या कार्यक्रमाला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली. 

विविध विकास कामांच्या उद्घाटनांचा कार्यक्रम काल संध्याकाळी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार होता. महिलांसाठी गुलाबी रिक्षा, शिवसेना कार्यालय, पादचारी पूल, कळव्यातील पुलांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होतं. मात्र कार्यक्रमाची पूर्वपरवानगी घेतली नसल्यानं आणि राजकीय नेत्यांचा त्यात सहभाग असल्यानं निवडणूक आयोगानं परवानगी नाकारलीय. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता सध्या लागू झाली आहे.