सांगली : शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवसन्मान जागर परिषदेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांच्यावर टीका केली. त्यानंतर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात चांगलाच गोंधळ घातला. यावेळी शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
शिवप्रतिष्ठान आणि शिवसन्मान परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूचे तीन-तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. तर दोन पोलिस जखमी आहेत, शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीची देखिल तोड़फोड केली आहे. या घटनेविषयी दोन्ही गटांनी सांगली पोलिसांकडे परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.
सांगलीत जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.