जळगाव : खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि कसमादे पट्ट्यात ४० दिवसांपासून पाऊस नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिकं पावसाअभावी वाळली आहेत, तर काही ठिकाणी वाढ खुंटली आहे.
दुबार पेरणीची वेळ गेल्याने शेतकऱ्यांनी दुबार पेरणीच्या बियाण्याची सोय केली होती, पण आता तेही व्यर्थ असल्याचं सांगण्यात येत आहे.
शेतीतील मशागतीची कामं पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना शेतशिवारात तसं कोणतंही काम राहिलेलं नाही. यामुळे शेतकऱ्यांना आता चिंता लागून आहे, दोन ते तीन महिन्याचा कालावधी असलेली पिकं कधीच वाया गेली आहेत.
विहिरीच्या पाण्याची पातळीही झपाट्याने खाली येतेय. पाऊस नसल्याने विजेची गरज वाढलीय, पण वीज निर्मितीला पावसामुळेच अडचणी येत असल्याने, विहिरीच्या पाण्यावरही शेती करणे शक्य होत नाहीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.