महिलेचे रौद्ररूप, आरटीओतील अधिकाऱ्याने घेतले शौचालयात कोंडून

आरटीओ कार्यालयासमोर गाडी उभी करण्यावरून एका मुलाला परिवहन अधिकाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या मुलाच्या आईचे रौद्ररूप पाहताच अधिकाऱ्यावर स्वतःला शौचालयात कोंडून घेण्याची वेळ आली.

Updated: Sep 2, 2015, 04:04 PM IST

कल्याण : आरटीओ कार्यालयासमोर गाडी उभी करण्यावरून एका मुलाला परिवहन अधिकाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीचा जाब विचारायला गेलेल्या मुलाच्या आईचे रौद्ररूप पाहताच अधिकाऱ्यावर स्वतःला शौचालयात कोंडून घेण्याची वेळ आली.

येथील एका मुलाने आपली गाडी कल्याण आरटीओ परिसरात उभी केली होती. ही गाडी रस्त्यावर उभी केल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी प्रशांत शिंदे याने मारहाण केल्याचा आरोप त्याने केलाय. केलेल्या या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी त्यामुलाच्या आईने थेट परिवहन कार्यालय गाठत अधिकारी शिंदे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचे रौद्ररूप पाहता अधिकारी शिंदे यांनी तेथून पळ काढत जवळील शौचालयात आसरा घेतला. 

मात्र, त्या मुलाच्या आईने त्याठिकाणी बसूनच शिंदे बाहेर येण्याची सुमारे एक तास वाट पाहीली. पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीमुळे शिंदे यांना बाहेर काढण्यात आले. यामुळे परिवहन कार्यालयात कामासाठी आलेल्यांची दोन तास चांगलीच करमणूक झाली. दरम्यान, अधिकारी नसल्याने कामाचा खोळंबा झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.